रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 16

  • 3.3k
  • 1.3k

अध्याय 16 लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्‍याच्या वेषात रावणाचे आगमन : ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्‍याच्या वेषात रावणाचे आगमन : लक्ष्मण गेला रामापासीं । सीता एकली गुंफेसीं ।रावण आला तेचि संधीसीं । सीतेपासीं भिक्षुवेषें ॥ १ ॥ एतदंतरमासाद्य दशग्रीवः प्रतापवान् ।परिव्राजकरुपेण वैदेहिमन्ववर्तत ॥ १ ॥ गुंफे नसतां श्रीरामलक्ष्मण । शून्य मंदिरी रिघे श्वान ।तेंवी आला दशानन । सीताहरणकार्यार्थी ॥ २ ॥गर्भजन्में जन्मली नाहीं । सीता देहींच विदेही ।तिचे हरन करावया पाहीं । आला लवलाहीं लंकानाथ ॥ ३ ॥सीताहरण करुं म्हणतां । मुळींच भीक लागली लंकानाथा ।चौपालवी आली हाता । अंगीं अशुभता बाणली ॥ ४ ॥चौदा चौकड्यांचें राज्यलक्ष्मण ।