रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 18

  • 3.1k
  • 1.2k

अध्याय 18 रावण सीतेला अशोकवनात पाठवतो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जटायू मूर्च्छित झाल्यामुळे सीतेला शोक : जटायूस स्वयें रावण । वधिता जाला करोनि छळण ।ते देखोनि सीता जाण । झाली आपण अति दुःखी ॥ १ ॥ तं स्वल्पजीवितं भूमौ क्षतजार्द्र जटायुषम् ।निरिक्ष्य पतितं सीता विललाप सुदुःखिता ॥ १ ॥ जटायूचे उपडितां पांख । भूमीं मूर्च्छित जीव निःशेख ।त्याचें देखोनियां असुख । परम दुःख सीतेसी ॥ २ ॥न पवतीच श्रीरामलक्ष्मण । जटायु करितां सोडवण ।तों त्यासीच आलें मरण । कपटी रावण दुष्टात्मा ॥ ३ ॥जटायूसी म्हणे आपण । तुझें मज न येचि कां मरण ।तूं बळियां बळीं संपूर्ण । मजलागीं प्राण