रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 19

  • 3.6k
  • 1.3k

अध्याय 19 श्रीरामांचा सीताशोक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेवर राक्षसिणींचा पाहारा असतो त्याचे वर्णन : अशोकवनीं सीतेपासी । दुष्ट दुर्धर राक्षसी ।रावण ठेवी भेडसावयासी । भयें आपणासी वश होईल ॥ १ ॥ अशोकवनिकामध्ये मैथिली नीयतामिती ।तत्रेयं रक्ष्यतां गूढं युष्माभिः परिवारिता ॥ १ ॥ सीतासंरक्षणीं नित्यवासी । विकटा विकृता समयेंसी ।विरुपा विक्राळा राक्षसी । अशोकवनासी त्या आल्या ॥ २ ॥नानारुपा नानाकारा । विक्राळा कराळा अति उग्रा ।भिंगुलवण्या भयासुरा । आल्या समग्रा सीतेपासीं ॥ ३ ॥एकीचें विक्राळ वदन । सर्वांगासी एकचि कान ।तीसी कानचि आच्छादन । येरवीं नग्न कराळी ॥ ४ ॥लागतां कानाचा फडकारा । नक्षत्रें पडती जैशा गारा ।जयाचें भय सुरसुरां