रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 20

  • 3.4k
  • 1.2k

अध्याय 20 उमा व श्रीराम यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पौणिमेच्या रात्री गवताच्या अंथरुणावर पहुडले असता श्रीरामांचा झालेला मनःक्षोभ : पूर्णिमेची रात्री शोभयमान । तृणशेजे रघुनंदन ।करिता जाला सूखें शयन । करीं पादसंवाहन सौमित्र ॥ १ ॥चंद्रादय मनोहर । चंद्रकिरण अति सुकुमार ।अंगीं लागतां श्रीरामचंद्र । उठी सत्वर गजबजोनी ॥ २ ॥ सौमित्रे ननु सेव्यतां तरुतलं चंडांशुरुज्जंभते ।चंडांशोर्निशि का कथा रघुपते चंद्रोयऽमुन्मीलति ।वत्सैतद्भवता कथं नु विदितं धत्ते कुरंगं यतः ।क्वासि प्रेयसि हा कुरंगनयने चंद्रानने जानकि ॥ १ ॥ श्रीराम म्हणे लक्ष्मण । खडतर सूर्याचे किरण ।मज बाधिती दारुण । बैसूं दोघे जण तरुतळीं ॥ ३ ॥तंव सौमित्र म्हणे श्रीरघुनाथा