किष्किंधाकांड अध्याय 1 श्रीराम-हनुमंत भेट ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम-हनुमंत भेट आदित्यान्वयसागरे दशरथः स्वातीजलं निर्मलंकौसल्याजठराख्यशुक्तिपुटके श्रीराममुक्ताफलम् ।तन्नीलं हृदाये हरेण पदकं सम्यग्धृतं सुज्ज्वलंसच्छत्रं स्मरणेन शंकरसमं प्राप्तोति भाग्यं जनः ॥१॥सच्चिदानंदरुपाय जनार्दनस्वरुपिणे ।स्वप्रकाशाय शुद्धाय आचार्याय नमो नमः ॥२॥मायातीताय नित्याय मायागुणप्रकाशिने ।व्यक्ताव्यक्तस्वरुपाय आचार्याय नमो नमः ॥३॥ श्री एकनाथांचे आत्मनिवेदन : अरण्यकांडा झाले निरुपण । श्रीरामें केलें संपुर्ण ।आता किष्किंधाकांडकथन । श्रीरघुनंदन स्वयें वदवी ॥१॥माझ्या अंगीं मुर्खपण । त्या मजकरवीं रामायण ।श्रीराम वदवी आपण । निग्रहूनि निजबळें ॥२॥सांडोनि रामकथालेखन । मजकरितां गमनागमन ।मार्गी श्रीराम रामायाण । स्वयें संपूर्ण प्रकाशी ॥३॥करूं बैसतां भोजन । ग्रासोग्रासीं स्मरे रघुनंदन ।मागें घालूनि जेवन । राम रामायण स्वयें वदवी ॥४॥पाहों