अध्याय 5 वालीकडून सुग्रीवाचा पराभव ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ वालीच्या सामर्थ्याने सुग्रीवाला भीती : पुढती वाळीच्या संत्रासीं । सुग्रीव सांगे श्रीरामापासीं ।हृतराज्य गुप्त वनवासी । तेथेंही आम्हांसी मारूं धांवे ॥१॥ तेनाहमपविद्धश्च हृतदारश्च राघव ।तद्भयाश्च महीं कृत्स्नां विचरामि समंततः ॥१॥ऋष्यमूकं गिरिवरं भार्याहरणदुःखितः ।प्रविष्टोऽस्मि दुराधर्ष वालिनः कारणान्तरे ॥२॥ आम्हीं जावें जेथ जेथ । वाळी मागें धावें तेथ तेथ ।आमचा करावया जीवघात । वैर पोटांत दृढ धरिलें ॥२॥वालिभयें भयभीत । अहोरात्र असों गुप्त ।पाळती येवोनियां तेथ । शुद्धि सांगत वाळीसी ॥३॥ त्यामुळे सुग्रीव ऋषमूक पर्वताचा आश्रय घेतो : भयें भोंवतां दशदिशीं । नारदें सांगीतलें आम्हांसी ।जावोनि रहावें ऋषमूक पर्वतांसी । तेथें वाळीसी ऋषीशाप