रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 8

  • 2.8k
  • 1.1k

अध्याय 8 मागील अनुसंधान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामें उद्धरिलें वाळीसी । राज्यभिषिंचन सुग्रीवासी ।सुखी केलें स्वयें तारेसी । देवोनि अंगदासी यौवराज्य ॥१॥सुग्रीव राजा निजभ्रतार । युवराज निजकुमर ।तारा तेणें सुखनिर्भर । श्रीरामचंद्रप्रसादें ॥२॥ अभिषेके तु सुग्रीवे प्रविष्टे वानरे गुहाम् ।आजगाम सहभ्राता रामळ पस्रवणं गिरिम् ॥१॥ प्रधान अंगदसमवेत । सुग्रीव गेला किष्किंधेत ।श्रीरामें वसविला माल्यवंत । गुहा प्रशस्त देखोनि ॥३॥ पावसाळा संपल्यावरही सुग्रीवाच्या उपेक्षेमुळे रामांचा क्रोध : माल्यवंतगिरिवरीं । प्रस्रवणगुहेभीतरीं ।श्रीराम राहिला मास चारी । सहे साहाकारी सौमित्र ॥४॥चारी मास पर्जन्यकाळ । श्रीराम राहिला सुनिश्चळ ।श्रीरामकार्या उतावेळ । शरत्काल स्वयें आला ॥५॥ग्रासोनि वर्षाकाळ । शीघ्र पावला शरत्काळ ।श्रीराम काळाचाही काळ