रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 9

  • 3.6k
  • 1.3k

अध्याय 9 वानरसेनेला श्रीरामदर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीव श्रीरामांना वानरसेनेचा विस्तार समजावून सांगतो : सुग्रीवें विनविला रघुवीर । सैन्य सेनानी सेनाधर ।सैन्ययूथपाळ महावीर । नमस्कार करूं पाहती ॥१॥स्वामि समवेत सौमित्र । पहावा वानरांचा संभार ।ऐकोनि सुग्रीवांचे उत्तर । जाला सादर श्रीराम ॥२॥ यूथपा दशसाहस्रं वृता वानरकोटिभिः ।वानयैः पार्वतीयैश्च सामुद्रैश्च महाबलैः ॥१॥ माझे कटकीं दहा सहस्र । सेनानायक सेनाधर ।एकएकातळीं कोटि वीर । अति दुर्धर रणयोद्धे ॥३॥उदयास्तगिरिपर्यंत । वानर आले जी समस्त ।नंदवनींचे वीर विख्यात । आले त्वरित रामाकार्या ॥४॥सप्तारण्य सप्तसमुद्र । नदीस्रोत वनें उखर ।तेथोनियां वानरवीर । आले सत्वर रामकार्या ॥५॥मेरू मंदार आणि विंध्याद्री । वेंकटाद्रि आणि सह्याद्री ।तेथोनि