रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 10

  • 3.3k
  • 1.2k

अध्याय 10 हनुमंत जन्मकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा प्रश्न : अगस्तिमहामुनीप्रती । प्रश्न केला श्रीरघुपतीं ।सुग्रीवा निजसखा मारूती । अद्‌भुतशक्ती असतां ॥१॥तेणें साधावया मित्र कार्यार्था । कां न करीच वाळीच्या घाता ।या हनुमंताच्या भावार्था । मजला साद्यंत सांगावें ॥२॥ राघवस्य वचः श्रुत्वा हेतुयुक्तमृषिस्तदा ।हनूमतः समक्षं तमिदं वचनमब्रवीत् ॥१॥ अगस्ती मारुतीची जन्मकथा सांगतात : ऐसें पुसता श्रीरघुनाथ । अगस्ति मुनि आनंदयुक्त ।हनुमंताचें निजसामर्थ्य । असे सांगत स्वानंदे ॥३॥आतां सांगेन श्रीरघुनाथा । हनुमंताची जन्मकथा ।सकळमूळारंभवार्ता । होय सांगता अगस्ति ॥४॥पुत्रेष्टियाग दशरथासी । ताटप्रसाद यज्ञपुरुषीं ।वसिष्ठें करोनि विभागांसी । तिघी राणियांसी दीधलें ॥५॥कैकेयीभाग हरिला घारीं । ते शापद्वारें जाली नारी ।तेथें वर्तली