रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 11

  • 3.9k
  • 1.5k

अध्याय 11 सीतेच्या शोधासाठी वानरांना पाठविले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीवाची श्रीरामांना विनंती : दाविला कपिसेनासंभार । अति दाटुगा हनुमंत वीर ।तेणें सुखावला श्रीरामचंद्र । केला नमस्कार सुग्रीवें ॥१॥वानरसेना कडकडाटीं । वेगीं रिघों लागे वैकुंठीं ।अथवा कैलासगिरितटीं । मेरुपृष्ठीं घालूं घाला ॥२॥रिघोनि पाताळाच्या पोटीं । मारूं दानवांच्या कोटी ।अथवा दैत्यांचि थाटी । उठउठीं निर्दाळूं ॥३॥गण गंधर्व सुरवर । यक्ष राक्षस नर किन्नर ।माझे निर्दाळिती वानर । चराचर उलथिती ॥४॥लोकालोकांहीपरती । कव घालोनि अवचितीं ।वानर कृतकार्य साधिती । आज्ञा रघुपति शीघ्र द्यावी ॥५॥ इति ब्रुवंतं सुग्रीवं रामो दशरथात्मजः ।बाहुभ्यां संपरिष्वज्य प्रीतो वचनमब्रवीत् ॥१॥ज्ञायतां सौम्य वैदेही निलये रावणस्य च ॥२॥ सीतेच्या शोध