रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 12

  • 2.9k
  • 1.2k

अध्याय 12 सीताशोधासाठी वानरांचे प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तिन्ही दिशांकडे वानरांना पाठविल्यावर दक्षिणदिशेकडे महापराक्रमी निवडक वीरांना पाठविले : नाना स्थानें स्वर्गवासीं । तेथें शोधावया सीतेसी ।सुग्रीवें सांगोनि तारापासीं । वेगीं तो स्वर्गासी धाडिला ।पूर्व पश्चिम उत्तर । स्वर्ग पाताळा धाडिले वीर ।दक्षिणदिशेचा विचार । सांगो कपीश्वर विसरला ॥२॥ऐसें न म्हणाचें श्रोतीं । दक्षिणदिशेची गती ।आहे सीतेची निजप्राप्ती । गोड ग्रासार्थीं राखिली ॥३॥गोड ग्रास तो रामायणांत । तो हा सीताशु्द्धीचा ग्रंथ ।ख्याति करील हनुमंत । लंकेआंत तें ऐका ॥४॥दक्षिणदिशेचा विचार । सीथाप्राप्तींचे मुख्य घर ।तेथें धाडिले महाशूर । वीर दिनकरप्रतापी ॥५॥ पितामहसुतं चैव जांबवंतं महाबलम् ।नीलमग्निसुतं चैव हनूमंतं च वानरम