सुंदरकांड अध्याय 1 लंकेचा शोध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम् ।काकुत्स्थं करूणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।राजेन्द्रं सत्यसंघं दशरथनयनम् श्यामलं शांतमूर्तिम् ।वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥ श्रीरामनामाचा महिमा : श्रीरामें पावन कथा । श्रीरामें पावन वक्ता ।श्रीरामें पावन श्रोता । श्रीराम स्वतां ग्रंथार्थ ॥ १ ॥श्रीरामें धन्य धरणी । श्रीरामें धन्य करणीं ।श्रीरामें धन्य वाणी । जे रामायणीं विनटली ॥ २ ॥श्रीरामें पावन संसार । श्रीरामें पावन चराचर ।श्रीरामें पावन नर । जें तत्पर नित्य स्मरती ॥ ३ ॥रामनामें शुद्ध साधन । रामनाम शुद्ध ज्ञान ।रामनामें सुते बंधन । नाम पावन सर्वार्थी ॥ ४ ॥रामनामें सरतें