रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 3

  • 3.2k
  • 1.3k

अध्याय 3 रावणसभेवर मारूतीचा पुच्छप्रयोग ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ बाजातपेठा, बिभीषणाचे मंदिर पाहूनही सीतेचा शोध लागला नाही : शोधितां बिभीषणमंदिर । सुखी झाला तो कपीन्द्र ।शुद्धि न लभेचि सीता सुंदर । तेणें वानर उद्वेगी ॥ १ ॥शोधिलें समस्त नगर । शोधिलीं हटकें घरोघर ।शुद्धि न लभेचि अणुमात्र । तेणें वानर उद्वेगी ॥ २ ॥शोधिलें समस्त नगर जाण । जन आणि अवघें वन ।स्वयें शोधिलें सावधान । तेणें उद्विग्न वानर ॥ ३ ॥सीताशुद्धर्थी उद्विग्न । अति चिंता कंपायमान ।आतां करी बुद्धि आपण । सीता चिद्रत्‍न तेणें लाभे ॥ ४ ॥ मारूतीची अभिनव योजना : येथें शोधावया सीताशुद्धर्थ । कळी माजवूं नगराआंत