रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 4

  • 3.3k
  • 1.3k

अध्याय 4 रावणाच्या शयनभवनांत सीतेचा शोध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रयत्‍नाची पराकाष्ठा करूनही सीतेचा शोध लागत नाही रावणाचें सभेआंत । न लभे सीताशुद्धीची मात ।तेणें दुःखें हनुमंत । चिंताग्रस्त दृढ झाला ॥ १ ॥दृढ प्रयत्‍न केला भारी । समस्त शोधिली लंकापुरी ।धांडोळिलें घरोघरीं । सीता सुंदरी तेथें नाहीं ॥ २ ॥विनोदें वाटिका अरामशिरीं । नद नदी वापी पोखरीं ।राजकुमरांच्या घरोघरीं । सीता सुंदरी तेथें नाही ॥ ३ ॥प्रत्यावर्ती लंकापुरीं । शतावृत्तीं घरोघरीं ।शुद्धि घेतां नानापरी । सीता सुंदरी तेथे नाहीं ॥ ४ ॥स्त्रीपुरूषांचे शेजारी । त्या स्थानांचे उपराउपरीं ।शोधितां कोट्यनुकोटी नारी । सीता सुंदरी तेथें नाहीं ॥ ५ ॥रावणाचे सभेमाझारीं