रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 8

  • 2.9k
  • 1.3k

अध्याय 8 रावण सीता संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाच्या आगमनाने सीतेची झालेली स्थिती : पूर्वप्रसंग संपतां तेथ । रावण होऊनि पंचोन्मत्त ।येवोनि अशोकवनांआंत । सीता पाहत भोगेच्छा ॥ १ ॥रावणें ऐसी देखिली सीता । कंपायमान अति भयार्ता ।जेंवी कदली वायुघाता । श्रीरामकांता तेंवी कांपे ॥ २ ॥देखोनियां दशानन । ऊरूउदरबाहुभूषण ।पीतांबर अति जीर्ण । तेणेंचि आपणा आच्छादी ॥ ३ ॥पीतांबर तो अति जीर्ण । तेणें अवयव आच्छादून ।जानकी अति लज्जायमान । अधोवदन राहिली ॥ ४ ॥नाहीं अभ्यंग ना स्नान । सर्वांग मलिन मळकण ।नाहीं आच्छादन आस्तरण । नाहीं आसन बैसावया ॥ ५ ॥सीता धरणिजा आपण । धरासनीं सुखसंपन्न ।बैसली