अध्याय 9 दशरथ – कौसल्या विवाहाची पूर्वकथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ मंदोदरीकडून रावणाचा अनुनय : रावण सीतेसी लावितां हात । हनुमान त्याचा करिता घात ।तों मंदोदरी येऊनि तेथ । अति अनर्थ चुकविला ॥ १ ॥अतिकायाची जननी । रावणप्रिया वनमालिनी ।तया रावणा आलिंगूनी । युक्तवचनीं बोलत ॥ २ ॥स्वदारकाम मजसीं रम । मजसीं रमणें हा स्वधर्म ।सीता अकाम चित्ता काम । परम अधर्म अधःपात ॥ ३ ॥सांडी अकाम सीतेंसी । स्वेच्छा रमावें मजसीं ।माझेनि कामें सुखी होसी । सीतेपासीं अति दुःख ॥ ४ ॥ सीताहरणामुळे होणारे भावी अनर्थ : श्रीरामकांता सीता सती । तिचे कामाचे आसक्तीं ।राक्षसांची जावया व्यक्ती । होईल