अध्याय 10 सीतेचा पश्चाताप ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेला रावणाच्या धमक्या : रावणें भेडसावितां सीता । त्याच्या पत्न्या ज्या समस्ता ।आश्वासिती श्रीरामकांता । नेत्रवक्त्रा खुणावूनि ॥ १ ॥ देवगंधर्वकन्याश्च विषेदू राक्षसीस्तदा ।ओष्ठप्रकारैरपरा नेत्राकारैस्तथा परा : ॥१॥सीतामाश्वासयामासुस्तर्जितां तेन राक्षसा ॥२॥ सीतेसी म्हणे स्वयें रावण । माझी भार्या न होतां पूर्ण ।तुझा घेईन मी प्राण । नाक कान कापूनी ॥ २ ॥फोडा इचे दोनी डोळे । वेगें मोडा रे सिसाळें ।स्तन कापा मांसगोळे । अंत्रमाळे काढा वेगीं ॥ ३ ॥तुझिया पातिव्रत्याची थोरी । भीड धरिली सहा मासवरी ।आतां भोगीन बलात्कारीं । राम भिकारी वनवासी ॥ ४ ॥रावणपत्न्यांनी सीतेला अभयाचे आश्वासन दिले :ऐसीं