रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 12

  • 2.9k
  • 1.2k

अध्याय 12 सीता – हनुमंत यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीता मारूतीला पूर्ववृत्तांत कथन करण्याची सूचना करिते : एकाएकीं अशोकवनां आंत । आला देखोनि हनुमंत ।त्यासी समूळ वृत्तांत । पुसे साद्यंत जानकी ॥ १ ॥मज वनवासीं असतां । तैं तूं नव्हतासी हनुमंता ।कैंचा आलासी तूं आतां । निजवृत्तांता सांगावें ॥ २ ॥कैसेनि राम देखिला दृष्टीं । तुज रामासीं कैसेनि भेटीं ।कैशा कैशा केलिया गोष्टी । जेणें पोटीं अति प्रीति ॥ ३ ॥कैसा बाणला तो वचनार्थ । साधावया श्रीरामाकार्यार्थ ।हनुमान प्राणेंसीं साह्यभूत । तो गुह्यार्थ मज सांगें ॥ ४ ॥श्रीराम भेटलिया कैसें सुख । श्रीरामवचनीं कैसें पीयूख ।श्रीरामसंगें कैसा हरिख