रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 13

  • 2.9k
  • 1.2k

अध्याय 13 हनुमंताकडून वनविध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मणी पाहून श्रीरामांना पूर्वींच्या गोष्टींचे स्मरण होईल ते सीता सांगते : मणि देवोनि वानराहातीं । स्वयें बोले सीता सती ।मणि देखोनि रघुपती । स्मरेल चित्तीं तिघांतें ॥ १ ॥कौसल्या माता आणि सीता । आठवेल दशरथ पिता ।तिघे आठवती श्रीरघुनाथा । कोण्या अर्था तें ऐका ॥ २ ॥पूर्वी समुद्रमंथनीं । तेथें निघाला कौस्तुभमणी ।तो घेतां श्रीविष्णूंनीं । इंद्र ते क्षणीं तळमळी ॥ ३ ॥ब्रह्मशापाच्या शापोक्तीं । सिंधुनिमग्न सर्व संपत्ती ।त्यांतील कौस्तुभ श्रीपती । माझा मजप्रती देइजे ॥ ४ ॥इंद्र मणि मागे करोनि ग्लानी । विष्णु त्यास दे फणिमणि बदलोनी ।इंद्रें देखतांचि नयनीं ।