रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 16

  • 3.1k
  • 1.1k

अध्याय 16 रावण सैन्याचा संहार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अपमानामुळे उद्विग्न झालेल्या इंद्रजिताचे पलायन व बिळात प्रवेश इंद्रजित पावोनि अपमान । अतिशयें जाला उद्विग्न ।हनुमंताचें बळलक्षण । सर्वथा संपूर्ण लक्षेना ॥ १ ॥हनुमंताची धैर्यवृत्ती । हनुमंताची संग्रामशक्ती ।हनुमंताची सवेग गती । अतर्क्यस्थिती लक्षेना ॥ २ ॥अतर्क्य हनुमंताची गती । ते लक्षेना नाना युक्तीं ।इंद्रजिताची खुंटली मती । रणीं मारूती नाटोपे ॥ ३ ॥रणीं नाटोपे मारूती । आपुलें पूर्वशौर्य कीर्तीं ।वानरें नेली निंदेप्रतीं । सलज्ज चित्तीं इंद्रजित ॥ ४ ॥इंद्रातें रणीं जिंकोन । पावलों इंद्रजित अभिधान ।वानरांसीं करितां रण । तृणसमान मज केलें ॥ ५ ॥मी एक गाढा वीर सृष्टीं ।