अध्याय 18 रावणाच्या दाढी-मिशा मारूतीने जाळल्या ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंतासी न चले घात । स्वयें सांगे इंद्रजित ।अवध्य वीर हा हनुमंत । साक्षेपें सांगत बिभीषण ॥ १ ॥इंद्रजित जो कां ज्येष्ठ सुत । नानायुक्ती स्वयें सांगत ।शस्त्रास्त्रीं ब्रह्मपाशांत । न चले पात हनुमंता ॥ २ ॥शस्त्रशक्ती अस्त्रशक्ती । मंत्रशक्ती तंत्रशक्ती ।कपटमायामोहनशक्ती । रणीं मारूती न धरवे ॥ ३ ॥कर्मपाश धर्मपाश । ब्रह्मयाचा ब्रह्मपाश ।बांधों न शके वानरास । जन्मपाश मुख्यत्वें ॥ ४ ॥बिभीषण प्रिय भ्राता । सांगतसे परम हिता ।शरण रिघावें श्रीरघुनाथा । काय म्यां आतां करावें ॥ ५ ॥सर्वथा अवध्य हा मारूती । इंद्रजिताची उपपत्ती ।बिभीषणाची भिन्न युक्ती