रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 23

  • 4k
  • 1.4k

अध्याय 23 सीतेचा शोध करून हनुमंताचे आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकादहन झाल्यावर सीतेची आज्ञा घेऊन मारूती परत येण्यास निघाला : आश्वासोनि श्रीरामकांता । भेटावया श्रीरघुनाथा ।हनुमंत होय निघता । तेचि कथा अवधारा ॥ १ ॥लंकादहन करोनि संपूर्ण । हनुमंतासी करितां गमन ।घ्यावया सीतेंचें दर्शन । आला परतोन तीपासीं ॥ २ ॥सीता सर्वांगीं अक्षत । पाहोनियां सावचित्त ।हनुमंत हर्षयुक्त । निघे त्वरित तें ऐका ॥ ३ ॥घ्यावया श्रीरामाची भेटी । हनुमंतासीं त्वरा मोठी ।वंदोनि सीता गोरटी । उठाउठीं निघाला ॥ ४ ॥वेगीं उल्लंघावया सागर । चौफेर अवलोकी वानर ।देखिला अरिष्ट गिरिवर । तेथे सत्वर वळंघला ॥ ५ ॥सकळ असिष्टां आधार