रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 24

  • 3.7k
  • 1.3k

अध्याय 24 वानरांकडून मधुवनाचा विध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताने सांगितले की सीतेच्या तेजाने रावण भस्मप्रायच झालेला आहे हनुमंत सांगे वीरांप्रती । सीता तपस्विनी श्रीरामसती ।तिनें राक्षसांची वीर्यशक्ती । नेली भस्मांतीं कोपाग्नीं ॥ १ ॥रावणाची शक्ति तेजोराशी । सीतेनें भस्म केले त्यासी ।राम निमित्त मारावयासी । रावणासी रणरंगीं ॥ २ ॥सीताक्षोभे दशानन । जळोन भस्म जाहला जाण ।पतीस यश दिधलें पूर्ण । रामें रावण मारिला ॥ ३ ॥सीता जाळी श्रीराम मारी । ऐसेनि राक्षसांची बोहरी ।क्षणें होईल लंकेमाझारी । सांगे वानरीं हनुमंत ॥ ४ ॥ ते ऐकून अंगदास स्फुरण चढले व स्वतःचसर्वांचा संहार करून यावे असे तो सुचवितो एकोनि हनुमंताचें