अध्याय 28 ब्रह्मलिखित सीता-मारूती संवादकथन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पुढील वृत्तांत वाचन मागील प्रसंग संपतां । अंगदसुग्रीवजांबवंतां ।लक्ष्मणेंसीं श्रीरघुनाथा । घेवोनि उडतां हनुमंत ॥ १ ॥हनुमंताची परम कीर्ती । गगनीं सुरवर वानिती ।भूतळीं वाखाणिती जुत्पती । वानीं कपिकिर्तीं श्रीराम ॥ २ ॥आवडीं म्हणे श्रीरघुनाथ । सौमित्रां वाचीं ब्रह्मलिखित ।मुद्रिका देवोनि हनुमंत । करी एकांत सीतेसीं ॥ ३ ॥धन्य ब्रह्मयाचें ब्रह्मपत्र । धन्य श्रवणार्थी श्रीरामचंद्र ।धन्य वाचक सौमित्र । धन्य कपींद्र कपिकुळीं ॥ ४ ॥ श्रीराममुद्रेमुळे झालेली सीतेची अवस्था मुद्रिकातेजदेदीप्यता । श्रीराम आला मानी सीता ।तेणें होवोनि सलज्जता । सप्रेमता घाबरी ॥ ५ ॥सावधान पाहतां देखा । पुढें देखे आंगोळिका ।जाणोनि