रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 29

  • 3.5k
  • 1.1k

अध्याय 29 हनुमंतप्रतापाचे ब्रह्मलिखित वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताने केलेले श्रीरामलक्ष्मण वर्णन सीता पुसे श्रीरामज्ञान । ते सांगावया हनुमान जाण ।गिळोनियां ज्ञानाज्ञान । जाला सावधान श्रीरामें ॥ १ ॥सीतेनें पुसिली श्रीरामकथा । तेचि सांगावया स्वरूपता ।उल्हास हनुमंताचे चित्ता । यथार्थता सांगत ॥ २ ॥लक्ष्मणाचें निजलक्षण । ठाणमाण सगुणगुण ।समूळ सांगेल आपण । सावधान अवधारा ॥ ३ ॥सादर श्रवणार्थी स्वयें सीता । तेणें आल्हाद हनुमंता ।सावधान मिळाल्या श्रोता । वदे वक्ता आल्हादें ॥ ४ ॥श्रीरामरूप अति स्वरूप । रूपें जिंतला कंदर्प ।परी तो रूपेंचि अरूप । चित्स्वरूप श्रीराम ॥ ५ ॥राम राजीवलोचन । जगाचे नयना सादृश्य तें नयन ।परी देखणा