रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 30

  • 3.2k
  • 1.1k

अध्याय 30 असाळीवधाचे वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेच्या आज्ञेला प्रमाण मानून त्याप्रमाणे वर्तन हनुमंताचें युद्धकंदन । मुख्यत्वें वनविध्वंसन ।घेवोनि सीतेचें आज्ञापन । फळभोजन मांडिलें ॥ १ ॥जोंवरी होय क्षुधाहरण । पडलीं फळें खाय वेंचोन ।घातली श्रीरामाची आण । फळें तोडोन न खावीं ॥ २ ॥जानकीआज्ञा वंदोनि शिरीं । वनाची करावया बोहरी ।हनुमान जाऊनियां दूरी । फळाहारीं बैसला ॥ ३ ॥काळाग्नि आव्हाहूनि जठरीं । मग बैसला फळाहारी ।वना आली महामारीं । वन संहारीं कपिपुच्छ ॥ ४ ॥सीतेची आज्ञा प्रमाण । घातली श्रीरामाची आण ।पुच्छें वृक्ष उपडोन । तळीं झाडोन फळें खाय ॥ ५ ॥पहिलें साकरेंचें टेंक । सव्यें सेवी पित्तशामक