रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 31

  • 2.8k
  • 1.1k

अध्याय 31 इंद्रजिताचा अपमान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण पुढील वर्णन वाचतो इंद्रजित युद्धा निघतां आवेशीं । असाळी उठिली विवशी ।श्रीरामें निरसिलें तियेसी । अति उल्हासीं हनुमंत ॥ १ ॥गजदळेंसीं अति उन्नद्ध । सैन्य देखोनियां सन्नद्ध ।हनुमंतासी अति आल्हाद । श्रीराम गोविंद तुष्टला ॥ २ ॥राक्षस मारावया अति अद्‌भुत । वनउपाडा पाहे सुमूहूर्त ।इंद्रजित गांजोनियां तेथ । गर्वहत करीन मी ॥ ३ ॥माझें पुरावावया मनोरथ । आजि तुष्टला श्रीरघुनाथ ।इंद्रजित आला सैन्यासमवेत । हनुमान नाचत स्वानंदें ॥ ४ ॥पुच्छ नाचतें पैं रणीं । मारोनियां वीरश्रेणी ।पूजूं चामुंडा चवंडायणी । भूतां देऊं धणीं मांसाचीं ॥ ५ ॥अखया कुमराची बोहणी । प्रथम