रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 36

  • 2k
  • 720

अध्याय 36 रावणाकडून बिभीषणाचा अपमान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणकृत हनुमंतप्रतापवर्णनाने सर्व सभा लज्जायमान : कपिपुरूषार्थ अति प्रचंड । राक्षसांचें बळबंड ।प्रताप ऐकतां काळें तोंड । लज्जा वितंड लंकेशा ॥ १ ॥हनुमंताचें अति प्रबळ । बिभीषणें वानिलें बळ ।तेणें राक्षसें सकळ । तळमळ पैं करिती ॥ २ ॥राक्षस सेनानी प्रधान । अवघे जाले हीन दीन ।सभा समस्त लज्जायमान । म्लानवदन दशमुख ॥ ३ ॥हें देखोनि इंद्रजित । कोपें जालासें कृतांत ।बिभीषणासीं बोलत । निजपुरूषार्थ वर्णोनी ॥ ४ ॥ इंद्रजिताचा संताप, स्वपराक्रम प्रौढी व बिभीषणाची निंदा : इंद्रजित बोले कोपायमान । काकाजी तूं तंव धर्मसंपन्न ।बुद्धियुक्तिप्रज्ञानपन्न । कनिष्ठ वचन कां वदसी