रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 40

  • 2.9k
  • 1.2k

अध्याय 40 सेतुबंधनाची पूर्णता ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ समुद्र निघून गेल्यावर सेतू बांधण्याची तयारी; वानरांना तसा आदेश : नळहस्तें सेतुबंधन । समुद्रें श्रीरामासी सांगोन ।वंदोनियां श्रीरामचरण । आज्ञा पुसोन स्वयें गेला ॥ १ ॥ऐकोनि समुद्राचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ।नळासी संमुख आपण । प्रीतिवचन बोलत ॥ २ ॥प्रीतिप्रेमाचें वचन । नळासी बोले रघुनंदन ।सखा माझा तूं जीवप्राण । सेतु निर्माण करी आतां ॥ ३ ॥समुद्रें सांगितलें आपण । तुझेनि हातें सेतुबंधन ।घेवोनियां वानरगण । सेतु निर्माण करी आतां ॥ ४ ॥स्वयेंची श्रीरघुनाथ । स्वमुखें सुग्रीवासी सांगत ।प्रधान जुत्पती समस्त । मुख्य हनुमंत आदिकरोनी ॥ ५ ॥नळहस्तें सेतुबंधन । समुद्रें सांगितले