रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 42

  • 3k
  • 1.2k

अध्याय 42 अतिकायाकडून रावणाची कानउघाडणी ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आला ऐकोनि रघुनंदन । भयें भयभीत दशानन ।प्रधान सेना अति उव्दिग्न । लंकाजन सकंपित ॥ १ ॥चाकाटला रावण । तंव भेरी लावोनि निशाण ।स्वयें आला रघुनंदन । वानरसैन्यसंभारीं ॥ २ ॥ लंकेत सर्वत्र हाहाकार व रावणावर दोषारोप : शंख भेरी टाळ घोळ । काहळा वाजती चिनकाहळ ।ढोळ पटह मांदळ । ध्वनि आगला बुरूंगें ॥ ३ ॥धडैधडै विख्यात वाही । निशाणां लागली एक घाई ।विराणीं वाजती दोहीं बाहीं । गिडबिड ठायीं गर्जती ॥ ४ ॥ऐसा वाजंत्रांचा गजर । घेवोनि कपिकुळसंभार ।लंके आला श्रीरघुवीर । केला भुभुःकार वानरीं ॥ ५ ॥देखोनि श्रीरामाचा यावा