रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 2

  • 2.8k
  • 1.1k

अध्याय 2 श्रीरामांकडून रावण छत्राचा भंग ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ शार्दूळ परत येतो, त्याची बिकट अवस्था व त्याचे कथन : पूर्वप्रसंगवृत्तांत । रडत पडत कुंथत ।शार्दूळ आला रुधिरोक्षित । तयासी पुसत लंकेश ॥ १ ॥ वीक्ष्यमाणो विषण्णं तु शार्दूलं शोककर्षितम् ।उवाच प्रहसन्नेव रावणो भीमदर्शनः ॥१॥अयथावच्च ते वर्णो दीनश्चासि निशाचर ।नासि कश्चिदमित्राणां क्रुद्धानां वशमागतः ॥२॥इति तेनानुष्टस्तु वाचं मंदमुदीरयत् ।न ते चारयितुं शक्या राजन्वानरपुंगवाः ॥३॥नापि संभावितुं शक्यं संप्रश्र्नोपि न लभ्यते ॥४॥ शार्दूळ देखोनि अति दुःखीत । त्यासी पुसे लंकानाथ ।वैरिसासी जालासी हस्तगत । रुधिरोक्षित दिसतोसी ॥ २ ॥सादरें पुसतां रावण । शार्दूळ बोले अति कुंथोन ।असंख्यात वानरांचें सैन्य । संख्या कोण करुं