रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 3

  • 2.9k
  • 1.2k

अध्याय 3 रामांच्या मायवी शिराने सीतेचा छळ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रारंभी झालेल्या अपशकुनाने रावण उद्विग्न : साधावया रणांगण । मुळींच रावणा अपशकुन ।श्रीरामें केलें छत्रभंजन । अति उद्विग्न लंकेश ॥ १ ॥ विसर्जयित्वा सचिवान्प्रविवेश स्वामालयम् ।ततो राक्षसमादाय विद्युज्जिव्हं महाबलम् ॥१॥मायाविनं महाघोरमब्रवीद्राक्षसाधिपः ।मोहयिष्यामहे सीतां मायया जनकात्मजाम् ॥२॥शिरो मायामयं गृह्य राघवस्य निशाचर ।मां त्वं समुपतिष्ठस्व महच्च सशरं धनुः ॥३॥एवमुक्तस्तथेत्याह विद्युज्जिह्वो निशाचरः ।तस्य तुष्टोऽभवद्राजा प्रददौ चास्य भूषणम् ॥४॥ छत्रभंगाचा अपशकुन । तेणें उद्विग्न रावण ।विसर्जूनियां प्रधान । आला आपण निजधामा ॥ २ ॥सबळ बळें श्रीरघुनाथा । वानरसैन्य असंख्यातता ।काय म्यां करावें आतां । प्रबळ चिंता लंकेशा ॥ ३ ॥ रावणाचे विचार :