रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 10

  • 2.7k
  • 1.2k

अध्याय 10 इंद्रजिताला मांत्रिक रथाची प्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ युद्ध चालू असता रात्र झाली : रणीं करितां द्वंद्वयुद्ध । इंद्रजित गांगिला सुबद्ध ।त्याचे पोटीं अति विरुद्ध । रात्रीं शरबंध करावया ॥ १ ॥प्रथम गांजिलें हनुमंते । तें बहु दुःख इंद्रजितातें ।अंगदें गांजितां येथें । अति लज्जेतें पावला ॥ २ ॥अपमानाचें अति विरुद्ध । रामलक्ष्मणादि वीर विविध ।रणीं करावया शरबंध । रात्रीं युद्ध मांडिलें ॥ ३ ॥ युद्ध्यतामेव तेषां तु तदा वानररक्षसाम् ।रविरस्तंगतो रात्रिः प्रवृत्ता प्राणहारिणी ॥१॥अन्योन्यं बद्धवैराणां घोराणां जयमिच्छताम् ।संग्रवृत्तं निशायुद्धं तदा वानररक्षसाम् ॥२॥राक्षसोऽसीति हरयो वानरोऽसीति राक्षसाः ।अन्योन्यं समरे जघ्नुस्तस्मिंस्तमसि दारुणे ॥३॥हत दास्य चैहीति कथं विद्रवसीति च ।एवं सुतुमुलः