रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 18

  • 2.7k
  • 1.1k

अध्याय 18 नील व रावणाचे युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाचे रामांस वंदन करुन प्रयाण : श्रीरामें निरुपण सांगून । बंधूसी पावली मूळींची खूण ।घालोनियां लोटांगण । श्रीरामाचरण वंदिले ॥ १ ॥वंदितां श्रीरामचरण । लक्ष्मणासीं आलें स्फुरण ।श्रीरामें देवोनी अलिंगन । धाडिला आपण संग्रामा ॥ २ ॥ स रावणं वारणहस्तबाहुं ददर्श भीमोद्यतदीप्तचापम् ।प्रच्छादयंतं शरवृष्टिजालैस्तान्वानरान्बाणविकीर्णदेहन् ॥१॥तमालौक्य महातेजा हनुमान्मरुतात्मजः ।निवार्य शरजालानि विदुद्राव स रावणम् ॥२॥रथं तस्य समासाद्य तोदमाक्षिप्य सारथेः ।त्रासयन्‍रावणं धीमान्हनुन्मान्वाक्यमव्रवीत ॥३॥एष मे दक्षिणो बाहुः पंचशाखः समुद्यतः ।विधमिष्यति हे देहे भूतात्मानं चिरोषितम् ॥४॥ वानरसैन्याला रावणापांसून पीडा : रावणाचें उग्र स्वरुप । अत्युग्र वाहोनिया चाप ।अनिवार शरप्रताप । वानरदर्प भंगिला ॥ ३ ॥रावणाच्या