रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 20

  • 3.1k
  • 1.1k

अध्याय 20 कुंभकर्णाला जागृत करतात ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दुःखित मनःस्थितीमध्ये रावणाचे आगमन : श्रीरामासीं करितां रण । रणीं भंगला रावण ।लज्जायमान अति उद्विग्न । आला आपण लंकेसीं ॥ १ ॥ स प्रविश्य पुरीं लंका रामबाणभयार्दितः ।भग्नदर्पस्तदा राजा बभूव व्यथितेंद्रियः ॥१॥मातंग इव सिंहेन गरुडेनेव पन्नगः ।अमिभूतोऽभवद्राजा राघवेण महात्मना ॥२॥ब्रह्मदंडप्रतीकानां विद्युत्सदृशवर्चसाम ।स्मरन्‍राघवबाणानां विव्यथे राक्षसेश्वरः ॥३॥ हीन दीन लज्जायमान । राजा प्रवेशे लंकाभुवन ।आठवितां श्रीरामबाण । धाकेंचि प्राण निघों पाहे ॥ २ ॥जैसा विजेचा लखलखाट । तैसा बाणांचा कडकडाट ।श्रीरामबाणें दशकंठ । धाकें यथेष्ट धाकत ॥ ३ ॥ब्रह्मदंडा न चले निवारण । तैसे अनिवार श्रीरामबाण ।तिहीं बाणीं त्रासिला रावण । आक्रंदे पूर्ण