अध्याय 21 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥॥ श्रीभावार्थरामायण ॥युद्धकांड॥ अध्याय एकविसावा ॥रावण व कुंभकर्ण यांचा संवाद॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ भयानक कुंभकर्णाला पाहून वानर सैन्याची अस्वस्थता :प्रबोधोनि कुंभकर्णा । भेटों जातां पैं रावणा ।भय उपजलें वानरगणा । त्याच्या उग्रपणा देखोनी ॥ १ ॥ जगाम तत्रांजलिमालया वृतः शतक्रतुर्गेहमिव स्वयंभुवः ।तं मेरुशृंगप्रतिमं किरीटिनं स्पृशंतमादित्यमिवात्मतेजसा ॥१॥वनौकसः प्रेक्ष्य विवृद्धमद्भुतं भयार्दिता दुदुविरे समंततः ।केचिच्छरण्यं शरणं स्म रामं वज्रांति केचिद्व्यथिताः पतंति ॥२॥कैविद्दिशश्च त्वरिताः प्रयांति केचिद्भयार्ता भुवि शेरते स्म ॥३॥ मेघांचिया मेघमाळा । शोभती कुंभकर्णाच्या गळां ।मुकुट टेंकला नभोमंडळा । तेजें रविकळा लोपती ॥ २ ॥कराळ विक्राळ भयानक वदन । प्रळयतेजें अत्युग्र नयन ।देखोनि त्याचें भ्यासुरपण । वानरगण त्रासले ॥