रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 22

  • 2.4k
  • 1k

अध्याय 22 वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभकर्ण नारदाची उक्ती सांगतो : नारदसंवाद–लक्षण । समूळ मूळीचें रामायण ।रावणासी कुंभकर्ण । स्वयें आपण सांगत ॥ १ ॥ शृणुष्वेदं महाराज मम वाक्यमरिंदम ।यदर्थं तु पुरा सौ‍म्य नारदाच्छुतवानहम् ॥१॥षण्मासाद हमुत्थायअशित्वा भक्ष्यमुत्तमम ।नच तृप्तोऽस्मि राजेंद्र ततोऽहं प्रस्थितो वने ॥२॥बहूनि भक्षयित्वाहं सत्वानि विविधानि वै ।भुवत्वा चाप्रीणनं कृत्वा शिलातलमुपाविशत ॥३॥ शत्रुदमनीं अति समर्था । ऐकें बापा लंकानाता ।नारदमुखें मी ऐकिली कथा । सावधानता अवधारीं ॥ २ ॥ कुंभकर्ण – नारद भेट : सहा मासां मज जागेपण । खातां उत्तम अन्नपक्वान्न ।तृप्ती न पवेचि संपूर्ण । मग मी आपण वना गेलों ॥ ३