रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 24

  • 3k
  • 1.1k

अध्याय 24 नारद रावण संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मंदोदरीच्या भवनात धर्मऋषींचे आगमन : श्रीरामपदांबुजीं नित्य न्हातां । श्रीरामकीर्ती अखंड गातां ।श्रीरामरुपीं मन वसतां । श्रीरामता उन्मनेंसीं ॥ १ ॥मंदोदरीचिया भवानासी । स्वभावें आला धर्मऋषी ।तिणें पुजोनियां त्यासी । अत्यादरेंसी पूसिलें ॥ २ ॥नारदमुनींच्या वचनासी । परम विश्वास रावणासीं ।हे पूर्व कथा जाली कैसी । विदित तुम्हांसी तरी सांगा ॥ ३ ॥ मंदोदरीच्या प्रश्नाला धर्मऋषींचे उत्तर : ऋषि म्हणे मी स्वधर्मता । जाणें भूतभविष्यार्था ।तुझ्या पश्नाची निजकथा । सावधानता अवधारीं ॥ ४ ॥पूर्वी भेटी सनत्कुमारांसी । त्यांच्या वचनार्था श्रद्धेसीं ।तेंचि पुसतां नारदापासीं । आला विश्वासी परमार्थी ॥ ५ ॥परी विरोधें