रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 25

  • 3k
  • 1.2k

अध्याय 25 कुंभकर्णाचा युद्धाला प्रारंभ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावण मंदोदरीला गुप्तरहस्य सांगून परत पाठवितो : पूर्वप्रसंगामाझारीं । सभेसीं आली मंदोदरी ।तिसी एकांत गुह्योत्तरीं । धाडी अंतःपुरीं रावण ॥ १ ॥ अंतःपुराय गच्छ त्वं सुखिनी भव सस्नुषा ।एवमुक्त्वा परित्यज्य भार्यां प्रीतमना इव ॥१॥रावणस्तु ततो वाक्यं राक्षसानिदमब्रवीत ।कल्प्यतां मे रतः शीघ्रं क्षिप्रमानीयतां धनुः ॥२॥अथादाय शितं शूलं शत्रुशोणितरंजितम् ।कुंभकर्णो महातेजा रावणं वाक्यमब्रवीत् ॥३॥अहमेको गमिष्यामि रणं रणविशारद ॥४॥ मंदोदरीचे निर्गमन : रावणें मंदोदरीप्रती । सांगोनि एकांत गुह्योक्ती ।समाधानसुखनुवृत्तीं । अंतःपुराप्रती पाठवी ॥ २ ॥सपुत्रस्नुषेंसीं आपण । सांडोनि चिंता अनुद्विग्न ।सुखी राहावेंस समाधान । सुप्रसन्न सुखरुप ॥ ३ ॥ऐकोन रावणाचें वचन । मंदोदरी सुखसंपन्न