अध्याय 26 हनुमंत – कुंभकर्ण युद्ध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ क्रोधाविष्ट कुंभकर्णाकडून वानरसैन्याचा संहार : रणीं मारिले निशाचर । कुंभकर्णासीं क्रोध फार ।गिळावया पैं वानर । अति सत्वर धांवला ॥ १ ॥संमुख येतां कुंभकर्ण । मागां न सरती वानरगण ।अंगदें आश्वासिलें पूर्ण । करावया रण उद्यत ॥२॥ ते निवृत्ता महामायाः श्रुत्वांगदवचस्तदा ।नौष्ठिकीं बुद्धिमास्थाय सर्वे संग्रामकांक्षिणः ॥१॥अथ वृक्षान्महाकायाः शृंगाणि सुमहांति च ।वानरास्तुर्णमुत्पाट्य कुंभकर्णमभिद्रवन् ॥२॥ अंगदाचा वानरसैन्याला धीर : देवोनि रामनामाचा धीर । अंगदें परतविलें वानर ।करोनि वाढिवेचा गजर । धांवले समोर कुंभकर्णा ॥ ३ ॥सांडोनि शरीराची आस । मरणावरी घालोनि कांस ।वानरवीरां विशेष । अति उल्लास संग्रामीं ॥ ४ ॥रामनामाच्या गजरीं