रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 29

  • 2.8k
  • 1.1k

अध्याय 29 नरांतकाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभकर्णाच्या वधाने रावणाचा शोक : श्रीरामें मारिला कुंभकर्ण । ऐकोनियां पैं रावण ।स्वयें करी शंखस्फुरण । दुःखें प्राण निघो पाहे ॥ १ ॥ कुंभकर्णं हतं श्रुत्वा राघवेण महात्मना ।राक्षसा राक्षसेंद्राय रावणाय न्यवेदयन् ॥१॥स श्रुत्वा निहतं संख्ये कुंभकर्णं महाबलम् ।रावणः शोकसंतप्तो मुमोह च पपात च ॥२॥राज्येन नास्ति मे कृत्यं किं करिष्यामि सीतया ।कुंभकर्णविहीनस्य जीविते नास्ति मे स्पृहा ॥३॥तदिदं मामनुप्राप्तं बिभीषणवचः शुभम् ।यदज्ञानान्मया तस्यन गृहीतं महात्मनः ॥४॥ येवोनि घायाळ रक्षोगण । सांगती कुंभकर्णाचें मरण ।सुग्रीवें छेदिले नाककान । रामें करचरण छेदिले ॥ २ ॥ऐसा विटंबोनियां जाण । रणीं मारिला कुंभकर्ण ।अदट श्रीराम आंगवण ।