रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 31

  • 2.6k
  • 963

अध्याय 31 अतिकाय राक्षसाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ चौघा वानरांनी तिघा राजकुमारांना व दोन राक्षसांना मारिलेः चौघे मिळोनि वानर । तिघे रावण राजकुमर ।महापार्श्व आणि महोदर । पांचही महाशुर मारिले ॥ १ ॥आम्ही म्हणों हे वानर । पालेखाईरे वनचर ।परी हे निधडे महाशर । दुर्धर वीर मारिले ॥ २ ॥सखे बंधु मारिले तिन्ही । पितृव्य निमाले दोन्ही ।तें देखोनियां नयनीं । अतिकाय मनीं क्षोभला ॥ ३ ॥ अतिकायाचे क्रोधाने आगमन : मारिले देखोनि स्वजन । अतिकाय कोपायमान ।रविप्रभेंसीं समान । देदीप्यमान तेजस्वी ॥ ४ ॥एवढिया तेजासीं कारण । ब्रह्मदत्त वरद संपूर्ण ।प्राकृताचेनि हातें मरण । सर्वथा जाण न पावसी