रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 34

  • 2.8k
  • 1k

अध्याय 34 कुंभाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामसैन्य शरबंधनातून मुक्त झाले : स्वयें बिभीषण बोलत । हनुमान वीर अति विख्यात ।शरबंधी श्रीरघुनाथ । सैन्यासमवेत ऊठिला ॥ १ ॥अंगद सुग्रीव राज्यधर । जुत्पतींसमवेत वानर ।येणें उठविले समग्र । वीर शूर स्वामिभक्त ॥ २ ॥मारुतीस मानी श्रीराघव । मारुतीस मानी सत्य सुग्रीव ।मारुतीस मानिती वीर सर्व । कीर्ति अभिनव येणें केली ॥ ३ ॥निमिषे आणोनि पर्वत । वानर उठवोनि समस्त ।ठेवोनि आला जेथींचा तेथ । श्रीरामभक्त हनुमंत ॥ ४ ॥ ततो ऽ ब्रवीन्महातेजा सुग्रीवो वानराधिपः ।अर्थ्यं विज्ञापयन्नेवं हनूमन्तमिदं वचः ॥१॥येतो हतः कुंभकर्णः कुमाराश्च निषूदिता ।नेदानीमुपनिर्हारं रावणः कर्तुमर्हति ॥२॥लंकामभिपतंत्वाशु प्रगृह्योत्काः प्लवंगमाः ।ततोस्तंगत