रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 36

  • 2.4k
  • 972

अध्याय 36 मायावी सीतेचा इंद्रजिताकडून वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ करोनि मकराक्षाचा घात । विजयी बैसला श्रीरघुनाथ ।येरीकडे इंद्रजित । क्रोधन्वित तळमळी ॥ १ ॥ निहतं मकराक्षं तं दृष्ट्वा रामेण संयुगे ।शक्रजित्सुमहाक्रुद्धो विवेश रणसंकटम् ॥१॥ इंद्रजिताला चिंता : मकराक्ष मारिला महाकपटी । तें देखोनियां दृष्टीं ।इंद्रजित पडिला रणसंकटीं । त्याची गोष्टी अनुवादे ॥ २ ॥मारिले भरंवशाचे वीर । जे कां निधडे महाशूर ।त्यांसी मारिती वानर । पालेखाइर पशुदेही ॥ ३ ॥मारिला कुंभकर्ण महावीर । देवांतक निरांतक त्रिशिर ।वधिला अतिकाय दुर्धर । महोदर महापार्श्व ॥ ४ ॥प्रहस्त पावला रणीं मरण । कुंभ निकुंभ दोघे जण ।मकराक्षाचा घेतला प्राण । विंधोन बाण