रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 41

  • 3k
  • 1.1k

अध्याय 41 सुलोचनेचा अग्निप्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रणीं मारोनि इंद्रजित । सौ‍मित्र झाला विजयान्वित ।तेणें सुखावला रघुनाथ । सुग्रीवयुक्त स्वानंदे ॥ १ ॥हटी नष्टी कोटिकपटी । येणें इंद्रजित दुर्धर सृष्टीं ।तो मारितां शस्त्रवृष्टीं । सुखानुकोटी सर्वांसी ॥ २ ॥सुखी झाले नरवानर । सुखी झाले ऋषीश्वर ।दैत्य दानव सुरवर । सुखी समग्र सौ‍मित्रें ॥ ३ ॥ इंद्रजिताची पत्‍नी ध्यानस्थ असता इंद्रजिताचा भुजदंडपात : येरीकडे लंकेमाझारी । इंद्रजिताची भुजा थोरी ।पडली सुलोचनामंदिरीं । खड्गधारी सायुध ॥४ ॥सुलोचना निजमंदिरीं । शिवस्वरुप आणोनि अंतरी ।शिवस्मरणीं निरंतरीं । ध्यान करीत शिवाचें न् ॥ ५ ॥जवळी असतां सखिया बहुत । शिवपूजा करीत अद्‍भुत ।तंव अंगणीं