रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 46

  • 3.6k
  • 1.1k

अध्याय 46 हनुमंताचे नंदिग्रामाला प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अप्सरेने हनुमंताला राक्षसी मायेची कल्पन दिली : उद्धरोनियां ते खेचरी । विजयी झाला कपिकेसरी ।येरी राहोनि गगनांतरी । मधुर स्वरी अनुवादे ॥ १ ॥तुझिया उपकारा हनुमंता । काय म्यां उतरायी व्हावें आतां ।कांहि विनवीत तत्वतां । सावधानता परिसावें ॥ २ ॥तूं अदट दाटुगा वीर होसी । कळिकाळातें दृष्टी नाणिसी ।त्याहीवरी रामस्मरणेंसीं । अहर्निशीं डुल्लत ॥ ३ ॥रामनाम स्मरणापुढें । विघ्न कायसें बापुडें ।आश्चर्य देखिलें वाडेंकोंडें । तुजपुढें सांगेन ॥ ४ ॥तूं भावार्थी श्रीरामभक्त । नेणसी कपटाची मात ।निष्कपट तूं कपिनाथ । राम देखत सर्वत्र ॥ ५ ॥विनवीत असें मी तुजप्रती ।