रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 51

  • 3.4k
  • 1k

अध्याय 51 अहिरावण – महिरावण यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पर्वस्थानी पर्वत ठेवून हनुमंताचे आगमन : स्वस्थानीं ठेवोनि पर्वत । विजयी झाला कपिनाथ ।श्रीराम आनंदें डुल्लत । हरिखें नाचत कपिसैन्य ॥ १ ॥शरणागत बिभीषण । राजा सुग्रीव आपण ।सौ‍मित्रातें जीवदान । हनुमंतें जाण दीधलें ॥ २ ॥ वानरसैन्याची रामांना रावणावर चालून जाण्याची विनंती : काळें तोंड लंकानाथा । ब्रह्मशक्ति झाली वृथा ।पळोनि गेला न झुंजतां । तोंड मागुता न दाखवी ॥ ३ ॥जरी येता झुंजासीं । क्षणें मारितो रावणासी ।वानर उडती आवेशीं । लंकेशासी मारावया ॥ ४ ॥आज्ञा पुसती रामासी । वेगें निरोपे दे आम्हांसी ।अद्यापि याची भीड कायसी