रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 54

  • 4.2k
  • 1.3k

अध्याय 54 अहिरावणाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वप्रसंगीं निरुपण । श्रीहनुमंते महिरावण ।रणीं मारिला देखोन । अहिरावण क्षोभला ॥ १ ॥हनुमंताच्या पुच्छावर्ती । राक्षस पडीले नेणों किती ।निधडे निधडे वीर पुढती । बळें लोटती संग्रामा ॥ २ ॥आम्ही निधडे महावीर । राक्षसांचे भार अपार ।एक वानर दोघे नर । करुं चकचूर क्षणार्धे ॥ ३ ॥ हनुमंत रामाना आज्ञा देण्याची विनंती करितो : ऐकोनि राक्षसांच्या युक्ती । विनवी श्रीरामासी मारुती ।मज आज्ञापीं श्रीरघुपती । यांची शांती करीन ॥ ४ ॥श्रीराम म्हणे गा पवनात्मजा । सदा यशस्वी तुझिया भुजा ।प्राणदात तूं रघुराजा । कीर्तिध्वजा ब्रह्मांडी ॥ ५ ॥जानकीमनोरथाची वल्ली । प्रतापजीवनें