अध्याय 57 राक्षसांच्या आवरणाचा भेद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण व बिभीषणाच्या भाषणाने श्रीरामांनाक्रोध व बिभीषणाला रावणाच्या शोधाची आज्ञा : बहुतांपरी लक्ष्मण । विनविता झाला रघुनंदन ।तैसेचि बिभीषणही जाण । करी विनवण बहुतांपरी ॥ १ ॥विनविला वानरीं । महावीर कपिकेरी ।ऐकतां तिखट उत्तरीं । कोप रघुवीरीं पैं आला ॥ २ ॥त्रिपुरवधालागीं झडकरीं । क्रोध आला त्रिपुरारी ।त्याहूनि क्रोध रघुविरीं । दशशिरा वधावया ॥ ३ ॥मुरु दैत्य दुर्धर भारी । त्यालागीं खवळे मुरारी ।त्याहूनियां कोप रघुवीरीं । दशशिरा मारावया ॥ ४ ॥सृष्टिप्रळयाचे वेळे । संहारकाळ अति खवळे ।तेंवी छेदावया रावणशिसाळें । क्रोध खवळें श्रीरामीं ॥ ५ ॥ज्याची विक्षेपभृकुटी । क्षणें विध्वंसी