रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 58

  • 3.6k
  • 1k

अध्याय 58 रावणाच्या यज्ञाचा विध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वानरांनी संकल्प मोडला ; पण ते महामोहाच्या आवरणामध्ये अडकून पडले : अति दुस्तर संकल्पावरण । जेणें व्यापिलें त्रिभुवन ।तें निरसोनि हरिगण । करीत किराण चालिले ॥ १ ॥सद्‌गुरुचे कृपेपुढें । संकल्प कायसें बापुडें ।जेंवी रवीपुढें मेहुढें । तेंवी उडे अभावत्वें ॥ २ ॥निरसून दुस्तर आवरण । करीत रामनामगर्जन ।अति बळियाढे वानगण । देत किराण चालिले ॥ ३ ॥केउता आहे लंकापती । काळमुखा त्रिजगतीं ।चोरोनि आणिली सीता सती । तेणेंचि शांती झाली त्याची ॥ ४ ॥भस्म झालिया आवरणें । आतां काय करावें रावणें ।जीव घेवोन पळोन जाणें । अन्यथा जिणें दिसेना ॥